शिवशंकर बझारची सामाजिक बांधिलकी- स्वयंप्रभादेवी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2020

शिवशंकर बझारची सामाजिक बांधिलकी- स्वयंप्रभादेवी

शिवशंकर बझारची सामाजिक बांधिलकी- स्वयंप्रभादेवी


अकलूज(  प्रतिनिधी ) सध्या जगात व भारतात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणावर लागण चालू आहे. त्यामुळे शासनाने सर्व नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत शिवशंकर बझारने अन्नधान्याचे विभाग चालू ठेऊन नागरिकांना गरजेप्रमाणे अन्नधान्य माफक दरामध्ये उपलब्ध करून दिले आहे.
तसेच ग्राहकांनी घरात बसून मोबाईलवर मालाची मागणी केल्यास त्यांना घरपोच माल पोहचवून वाहतूक चार्जेस न आकारता सामाजिीक बांधिलकी जपणेचे दृष्टीने संस्थेच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी घरपोच माल माफक दरात देण्याची सुविधा चालू केली आहे.
स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी सर्व ग्राहकांना घाबरून न जाता आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या, आणि आमच्या सेवेचा फायदा घ्या. बझार आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages