Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरातील मोठया रुग्णालयात संशयित कोरोना विषाणू संसर्गाचा रूग्ण आढळला...

सोलापूर शहरातील मोठया रुग्णालयात संशयित  कोरोना विषाणू संसर्गाचा रूग्ण आढळला...


सोलापूर : सोलापुरातील एका मोठया रूग्णालयात न्यूमोनियाचा रूग्ण उपचार घेत आहे. यावरून शहरात कोरोनाचा रूग्ण आढल्याची भिती व्यक्त झाली. मात्र याला वैद्यकीय क्षेत्रातून कोणताच दुजोरा देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर तो रूग्ण नाशिकचा असून तो तिरूपतीवरून आला होता. आता त्या रूग्णास पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आल्याची अफवा सोशल मिडियावर फिरत आहे. न्यूमोनिया हा आजार कोरोनाच्या अनेक लक्षणापैकी एक असल्याने भिती अधिकच बळावली आहे मात्र या रूग्णालयाच्या वैद्यकीय प्रमुखांनी हा रूग्ण कोरोनाचे असल्याचे स्पष्ट केले नाही. हे रूग्णालय लवकरच प्रेस रिलीज जारी करून सविस्तर माहिती देणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments