Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात सोमवारी हातमाग कापड स्पर्धा

सोलापूरात सोमवारी हातमाग कापड स्पर्धा

सोलापूर दि. 6:-  राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षिस योजना राबवण्यात येते. यंदा ही स्पर्धा सोलापूर येथे 9 मार्च 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 25,000, 20,000 आणि 15,000 रुपये रोख बक्षिसे आहेत. या स्पर्धेकरिता सोलापूर सह सांगली कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्हयातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट, खाजगी हातमाग विणकर सहभागी होऊ शकतात. यास्पर्धेकरीता पारंपारिक गटात साडया, फुगडी, लुंगी, खणावळ,धोतरे आदी आणि अपांरपारिक गटात टॉवेल,चादरी, शर्टींग-सुटींग,पडद्याचे कापड, मफलर,शाल, वॉल हॅगिंग यांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या हातमाग विणकरांनी आपले नाविन्यपूर्ण वाण दिनांक 8मार्च 2020 पर्यंत प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, सोलापूर सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्था इमारत, जिल्हाधिकारी आवार, सोलापूर येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी 0217-2323161 येथे संपर्क साधावा.
Reactions

Post a Comment

0 Comments