Hot Posts

6/recent/ticker-posts

परीक्षाकेंद्र परिसरात कलम 144 लागू

परीक्षाकेंद्र परिसरात कलम 144 लागू

सोलापूर दि.6 :-  माध्यमिक शालांत (दहावीपरीक्षा शहरातील 32 परीक्षा  केंद्रावर सात उपकेंद्रावर घेण्यात येत आहे.परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परीसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहेया कलमाच्या अनुषंगाने परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर, फॅक्स, ईमेल, इंटरनेट आदी दळणवळण सुविधा बंद राहतील. वायरलेस सेट, ट्रान्झीस्टर, मोबाईल आदींचा परिक्षार्थीना वापर करता येणार नाही. पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येता येणार नाही. हे आदेश परीक्षेचे दिवशी  परीक्षा केंद्रच्या परीसरात पेपरच्या आगोदर एक तास नंतर एक तास  लागू राहतीलमात्र परीक्षा केंद्रात परीक्षा कामासाठी नेमलेल्या स्थायी, अस्थायी अधिकारी, कर्मचारी त्याच बरोबर बंदोबस्तावर असणारे सुरक्षा कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य शासकीय अधिकारी कर्मचा-यांना हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा अवमान करणाऱ्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपआयुक्त, बापू बांगर यांनी आदेशात नमूद केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments