मुलीसांठी सायकल बॅक चळवळ कौतुकास्पद : स्वरूपाराणी मोहिते पाटील
अकलूज / प्रतिनिधी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलीत शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज प्राध्यापक व माजी विद्यार्थी असोशिएशनच्या माध्यामातून मुलींसाठी राबविण्यात आलेली सायकल बॅंक चळवळ ही कौतुकास्पद असल्याचे मत संस्थेच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व महाविद्यालयाचे विकास समीतीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व दूर अंतरावर येणाऱ्या मुलींना महाविद्यालयात येणे जाणे साठी सायकल घेणेचे नियोजन करणेत आले होते. यासाठी सोशल मिडीयातून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळाला. जमलेल्या रकमेतुन महिला दिनाचे निमीत्ताने “सायकल बॅक” या योजनेच्या माध्यमातून १७ सायकलींचे वाटप स्वरूपाराणी मोहिते पाटील याचे हस्ते करणेत आले. अशा प्रकारे महाविद्यालयातील मुलींसाठी माजी विद्यार्थी असोशिएशन च्या माध्यामातून सायकल बॅंक योजना सुरू करणारे शंकरराव मोहिते महाविद्यालय हे महाराष्ट्रातले पहिले महाविदयालय असल्याचे प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख, सायकल बॅक समन्वयक डाॅ विश्वनाथ आवड , डाॅ दत्ता बारबोले, डाॅ अपर्णा कुचेकर, डाॅ बाळासाहेब मुळीक, डाॅ चंद्रशेखर ताटे देशमुख , डाॅ रत्नदिप गायकवाड, डाॅ संजय वाघमारे, प्रा दमयंती कांबळे, प्रा सविता सातपुते, युवराज मालुसरे यांचेसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सांस्कृतीक विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विदयार्थ्यांनी प्रयत्न केले.
0 Comments