जुळे सोलापूर पाण्याच्या टाकीवर संभाजी ब्रिगेड करणार शोले स्टाईल आंदोलन
सोलापूर :जुळे सोलापूर भागातील पाण्याच्या टाकीजवळ अनेक अवैध धंदे चालू असून काहीजणांनी चक्क पाण्याच्या टाकीच्या कंपाऊंडमध्ये अतिक्रमण केल्याने व महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्षित केल्याने नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिली आहे. जुळे सोलापूर परिसरातील हजारो नागरिकांना या पाण्याच्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचे पुरवठा करण्यात येतो त्यामुळे हा परिसर अतिसंरक्षित क्षेत्रात मोडत असतानाही महानगर पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सुरक्षा अभावी कोणी हि या परिसरात येतो व काहीही करून जाऊ शकतो त्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी जुळे सोलापूर पाण्याच्या टाकी जवळ दोन युवकांनी आत्महत्या केली होती त्यामुळे तत्कालीन नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी पाण्याच्या टाकीच्या परिसराला दगडी कंपाऊंड मारून बंदिस्त करण्याचा विषय बोर्ड मीटिंग मध्ये मांडला होता स्मार्ट सिटी च्या निधीतून या पाण्याची टाकी परिसरातील दगडी कंपाऊंड बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते संपूर्ण परिसर बंदिस्त करून लगतच्या जुळे सोलापूर पोलीस चौकी येथे दोन मुख्य गेट बांधण्यात येणार आहेत गेल्या तीन महिन्यापासून महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी च्या राजकीय दबावामुळे तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध व्हावे म्हणुन तेथील नर्सरी स्कूल चालवणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे व पाण्याच्या टाकी परिसरात अतिक्रमण करून एका कॅन्टीन चालवणार्या च्या धमक्या मुळे सदर काम थांबलेले असल्याची चर्चा आहे. येथील अतिक्रमण तात्काळ हटवून कंपाउंड वॉल बांधकाम कामास जे अडथळा निर्माण करतात अशा वर सरकारी कामात अडथळा आणल्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये दिवसाढवळ्या व रात्री अनेक अवैध धंदे चालू असून सगळीकडे मद्यपी लोकांचा वावर असून दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. अनेक जन येथेच लघु शंका करतात त्यामुळे येथील महिलांना लज्जास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. काही महिन्यापासून एक जोडपे तिथे वास्तव्यास आहेत पाण्याचा टाकीवर चढण्यासाठी तेथील दरवाजा उघडाच असतो त्यामुळे एखादी अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.
0 Comments