अकलूजमध्ये प्लास्टिक मुक्ति जनजागृती अभियान रॅली
अकलूज ( प्रतिनिधी) अकलूज शहर युवा सेना यांच्या वतीने व जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर २ यांच्या मदतीने अकलूजमध्ये प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली. प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियानाचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असुन, जिल्हा परिषद मुलींची शाळा नं.२ यांच्या मदतीने अकलूज शहरातील महर्षि कॉलीनी या परिसरात प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियानाची रॅली काढण्यात आली. तर लोकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगितले. सदर रॅली पार पाडण्यासाठी अकलूज शहर युवासेना प्रमुख शेखर खिलारे, अंगुले मॅडम,नागणे मॅडम, मस्के सर,मगर सर, नागणे सर, शिंदे मॅडम, जाधव मॅडम आदींनी परिश्रम घेतले. तर जिल्हा परिषद शाळा नं २ प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियानात सहभागी झालेबद्दल युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments