Hot Posts

6/recent/ticker-posts

युवकांच्या रोजगार बाबात सरकार निरुत्साही व अपयशी - डॉ प्रीती शेखर

युवकांच्या रोजगार बाबात सरकार निरुत्साही व अपयशी - डॉ. प्रीती शेखर

सोलापूर -  सरकारच्या राष्ट्रीय गुन्हे अहवाल समितीने 2018 साली एक अत्यंत धक्कादायक माहिती प्रकाशित केली की भारतात सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नाही म्हणून 13 हजार 541आत्महत्या केले या मध्ये महाराष्ट्रात जवळपास 13 शे च्या वर आत्महत्या केले.ही नोंदणीकृत माहिती असून या व्यतिरिक्त आणखी किती तरी तरुणाई आत्महत्या करत आहेत याची चिंता ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला  ही अत्यंत खेदाची बाब आहे सरकार युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरली असून निरुत्साही हे सरकार आहे. असे मत युवा महासंघाच्या राज्य सचिवा डॉ. प्रीती शेखर यांनी व्यक्त केले.  बुधवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने युवा महासंघाच्या  राज्य सचिवा डॉ प्रीती शेखर यांची  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,  2 जून 2015 मध्ये फडणवीस सरकारने नोकर भरती बंदी जाहीर केले निवडणूक समोर ठेऊन 72 हजार मेगाभरतीचे गाजर दाखवले मात्र यात तरुणाईची  घोर निराशा झाली. आज बेरोजगार नोंदणी कार्यालयच सरकार बंद केले ना ऑनलाईन ना ऑनलाइन. राज्य सरकार अर्थसंकल्पात युवा वर्गाच्या रोजगार बाबत कोणतीच ठोस तरतुद केली नाही.हे चित्र कधी बदलणार ? हे सरकार चे अपयश आहे. जो शिक्षण घेतो त्याला नोकरी देणे हे सरकारची मुख्य जबाबदारी आहे मात्र सरकार जबाबदारी झटकत आहे.तसेच CAA ,NRC, NPR व खाजगीकरण आणि सरकारची भांडवली धोरणावर सडकून टीका केली. यावेळी युवा महासंघाचे  जिल्हा सचिव अनिल वासम, जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी,उपाध्यक्ष अशोक बल्ला,सहसचिव दत्ता चव्हाण,कोषाध्यक्ष बाळासाहेब मल्याळ, विजय हरसुरे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments