एक ओंजळ धान्याची भूक भागवेल गरीबांची : सामाजिक बांधिलकी उपक्रम
सोलापूर : विठ्ठलवाडी येथील संभाजीराव चव्हाण माध्यमीक विद्यालय व जि प मराठी प्रा शाळा विठ्ठलवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी माढेश्वरी देवी अन्नछञ मंडळाला धान्य दान प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक ओंजळ धान्य दान करत सामाजिक बांधिलकी जपली.या लहान चिमुकल्यांचा उपक्रम अगदी भारावून टाकणारा आहे.नव्यानेच स्थापन झालेल्या श्री माढेश्वरी देवी अन्नछञ मंडळातर्फे दर मंगळवारी माढेश्वरी मंदिरात अन्नदान केले जाते .याला आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असावा म्हणून तेथील विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबविण्यात आला. यातील सहभागी विद्यार्थ्यांना अन्नछञ मंडळाचे प्रशस्तीपञक देण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक गव्हाणे सरपंच अरूण कदम उपसरपंच अनिल बरखडे मुख्याध्यापक सुभाष लोखंडे गोरखनाथ शेगर सुप्रिया ताकभाते विजय काळे तानाजी खरात तसेच अन्नछञ मंडळाचे अध्यक्ष मारूती दादा जगदाळे व समिती सदस्य अमर भांगे आदि उपस्थित होते. संभाजीराव चव्हाण माध्य विद्यालय विठ्ठलवाडी मुख्याध्यापक - अमोल चव्हाण सर , शिक्षक वृंद - नवनाथ कांबळे सर, शिवाजी कदम सर ,ज्ञानेश्वर मस्के सर ,जहाॅगीर तांबोळी सर , शिक्षकेतर = नेताजी उबाळे ,कैलास सस्ते, शामराव घोडके , सरपंच - अरूण कदम सर
0 Comments