मोदी सरकारने १० बँकांच्या ४ बँकात विलिनीकरण करण्याचा निर्णय
विलिनीकरणाच्या या योजनेनुसार
केंद्रीय मंत्रिमंडळान बुधवारी १० बँकांच्या चार बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून चार मोठ्या सरकारी बँका तयार करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. सरकार या बँकांच्या नियमित संपर्कातही होतं. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता या बँकांचं विलिनीकरण दृष्टीपथात आहे. विलिनीकरणाबद्दल या बँकांच्या संचालक मंडळानं आधीच मंजुरी दिली आहे. मोदी सरकारनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या 'मेगा मर्जर'ची घोषणा केली होती.
विलिनीकरणाच्या या योजनेनुसार
- सिंडीकेट बँक ही कॅनडा बँकेत विलीन करण्यात येईल
- अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन होईल
- आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होईल
- युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन होईल
0 Comments