खुशखबर.! 'स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला';कोरोनाला पळवून लावण्यासाठी घरात बसूनच मालिका पहा
सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह जगात कोरोना सारख्या महामारीपासून वाचवण्यासाठी संपूर्ण जगात लाॅकडाऊन म्हणजेच संचार बंदी करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही संचारबंदी करण्यात आलेली आहे. अनेकांना घरात बसून करमत नसल्याने व वेळ जात नसल्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या लढाया विषयी खरी माहिती, रणनीती व खरा इतिहास आमच्यास जगाला माहीती व्हावा आणि पन्हाळा गडाला विळखा घातल्यानंतर व आग्र्यात आडकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी व पुरंदरच्या तहा वेळी ओलीस असताना छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक दिवस एकाच जागी थांबून कसा लढा दिला होता. यासह ईतिहासातील अनेक घटनामुळे प्रेरणा मिळेल आणि कोरोना सारख्या विषाणूला पळवून लावण्यासाठी जनता सज्ज होईल. अशा आशयाची मागणी महाराष्ट्रातून अनेकांनी केली जात होती म्हणून झी टीव्ही ने "स्वराज्यरक्षक संभाजी" ही मालिका झी मराठी हे चॅनल पुन्हा प्रसारित करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकहो तुमच्या सर्वांच्या इच्छेखातर झी मराठी वर पुन्हा एकदा स्वराज्य रक्षक संभाजी ``शिवशंभू महागाथाʼʼ पुनःप्रक्षेपण होणार आहे . ३० मार्चपासून दररोज सायं ४ वाजता आणि पुनः प्रक्षेपण रात्री ८ वाजता होणार आहे. त्यामुळे भाकड कथा रचून तयार केलेल्या मालिका पहाण्यापेक्षा प्रेरणादायी मालिकांमुळे जनता मानसिकदृष्ट्या सक्षम बनून कोरोना सारख्या विषाणूला लढा देईल असा विश्वासही अनेकांनी केला आहे.
या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर आता प्रेक्षकांसाठी एक अनोखी पर्वणीच आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे. येत्या ३० मार्चपासून ही मालिका पुन्हा सुरू होत आहे. ३० मार्च रोजी मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईल. दुपारी ४ वाजता ही मालिका प्रसारित होईल. त्यानंतर दररोज ४ ते ८ या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.
करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. अनिश्चित काळासाठी सर्व शूटिंग रद्द केले गेले आहेत. अशा वेळी मनोरंजनासाठी जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत. दूरदर्शनसह सर्वच चॅनलवर अशा प्रेरणादायी ऐतिहासिक मालिका प्रसारित करून जनतेला मानसिकदृष्टया सक्षम बनवण्याचे काम करावे. अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर आता झी मराठी वाहिनीनेही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
0 Comments