तर देश सेवा केल्याचा आनंद आपणास मिळेल - सुरवसे पाटील
अकलूज (प्रतिनिधी ) कोरोनाच्या भीषण संकटात ज्यांना राहण्यास घर नाही, हातातले काम बंद आहे. खायला पुरेसे अन्न नाही अशा लोकांना, आपल्याला मिळालेल्या धान्यातील काही धान्य एखाद्या गरीब कुटुंबास दिल्यास त्या कुटुंबाचा आशीर्वाद आपणास मिळेल व आपणही समाजसेवा देशसेवा केल्याचा आनंद आपणास मिळेल असे प्रतिपादन स्वाभिमान ब्रिगेड संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी दैनिक कटुसत्यशी बोलताना केले.
पुढे बोलताना ते म्हणाले कोरोना सारख्या प्राणघातक अशा विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे.देशात लॉक डाऊन आहे.अशा परिस्थितीत कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार ८० कोटी कार्डधारकांना धान्य मिळणार आहे. ज्यांना धान्य मिळणार आहे असे बरेच लोक धनाने व मनाने मोठे असतील अशा लोकांनी सदर धान्याचा लाभ घेऊन काहीसे धान्य आपल्या परिसरातील गोरगरीब कुटुंबांना दिले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल व आपण समाजसेवा देशसेवा केल्याचा आनंद आपणास मिळेल असे रोहन सुरवसे पाटील म्हणाले.
0 Comments