महाविकास आघाडी नव्याने नियुक्त्या करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2020

महाविकास आघाडी नव्याने नियुक्त्या करणार

महाविकास आघाडी नव्याने नियुक्त्या करणार

मुंबई (दि. १९)  : राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, यांसह जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समिती, व्यसनमुक्ती समिती आदींच्या अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून महाविकास आघाडी सरकार या सर्व महामंडळ/ समित्यांच्या अध्यक्ष, संचालकांच्या नव्याने नियुक्त्या करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या शासन निर्णयाद्वारे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक विजयकर यांच्यासह मुंबई, नागपूर विभागासह सर्व संचालकांच्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचीही नियुक्ती याद्वारे रद्द करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्या रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, लवकरच विभागामार्फत नव्याने या नियुक्त्या करण्यात येतील असेही विभागामार्फत कळवण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages