महिला आणि युवकांनी गावाचा विकास साधावा : आ. देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2020

महिला आणि युवकांनी गावाचा विकास साधावा : आ. देशमुख

महिला आणि युवकांनी गावाचा विकास साधावा :  आ. देशमुख
भंडिशेगाव येथील विकासकामांना दिली भेट

सोलापुर : सोलापूर गावातील तरूणांनी राजकारण बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य द्यावे, महिलांनाही घरकामकरत छोट्या मोठ्या व्यवसायात उतरावे, सर्वांनी मिळून एकत्र कामकेले तरच गावाचा विकास होईल आणि गाव समृद्ध होईल, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.भंडीशेगाव (ता. पंढरपूर) गावाला बुधवारी आ. सुभाष देशमुख यांनी भेट देत विविध विकासकामांची पहाणी केली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी आ. देशमुख यांनी येथील व्यायामशाळेला भेट दिली. ही व्यायामशाळा पुढील महिन्यात सुरू होणार आहे. तसेच गावात ४२ एकरमध्ये ड्रीमगार्डन वनराई प्रोजेक्ट सुरू आहे. तेथे सोलापूर सोशल फौंडेशन आणि आलिशा कंडरे यांच्या माध्यमातूनउ कृषि पर्यटन केंद्राचे कामसुरू आहे, त्याची पहाणी आ. देशमुखांनी केली. गावदौर्‍यात त्यांच्यासोबत कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गंगारामविभूते, पं.स. सदस्या पल्लवी येलमार, साधना गिड्डे, सुवर्णा चौगुले, मीना येलमार, संगिता येलमार, उज्ज्वला शिंदे, माजी पोलिस अधिकारी आबासाहेब दैठणकर, माजी सरपंच राजाभाऊ माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश रणखांबे यांनी केले तर आभार साधना गिड्डे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages