अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद - जिल्हाधिकारी नवल किशोर राम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2020

अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद - जिल्हाधिकारी नवल किशोर राम

अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद
                                                  -  जिल्हाधिकारी नवल किशोर राम

            पुणे दि.18: पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 18 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतीलअसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
            आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशाअंतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी देशात सर्वत्र प्रवास करत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्हयात परदेश प्रवास करून आलेले आहेत व त्यातील बरेच प्रवाशी परतीच्या मार्गावर आहेतत्यामुळे कोरोनो विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधीक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहेअशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणेवास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्यक आहे. विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 18 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949 व  त्या अंतर्गत असलेल्या कलम  व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईलअसेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages