निरंकारी चँरीटेबल फाउंडेशनच्या वतीने वेळापुर येथे स्वच्छता अभियान संपन्न
अकलूज( प्रतिनिधी) निरंकारी मिशनचे सदगुरु हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंती निमीत्ताने संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अकलुज यांच्या वतीने वेळापुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.यावेळी बहुसंख्य स्वयंमसेकांनी सहभागी होवीन परीसराची स्वच्छता केली. निरंकारी चँरीटेबल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी भारतासह अनेक देशात स्वच्छता अभियान राबवण्यात येते.या वर्षीही सदगुरु हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंती निमीत्ताने संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशनच्या वतीने २३ फेब्रुवारी २०२० रविवार रोजी एकाच दिवशी संपूर्ण भारतामध्ये ४०० शहरात व ११६६ हास्पिटल मध्ये भव्य स्वरुपात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.येथिल अकलुज शाखेच्या वतीने वेळापुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियाना अंतर्गत निरंकारी स्वयंमसेवकांनी स्वच्छता व वृक्षारोपन केले.सदर अभियाच्या उदघाटन प्रसंगी आरोग्य अधिकारी डाँ.अनिरुध्द पिंपळे,अमरसिंह माने-देशमुख,श्रीनिवास कदम- पाटील,महादेवराव ताटे,कल्याण चव्हाण,अकलुज शाखेचे प्रमुख मारुती साळवे,ज्ञानप्रचारक चांदभाई तांबोळी,विनायक माने,लालासाहेब आडगळे,दिलीप कांबळे,प्रसिध्दी प्रमुख नागेश लोंढे,आरोग्य कर्मचारी चंद्रकांत उगाडे,काळुराम कुदळे,फरीदा पठाण,मोहन भोसले आदी उपस्थित होते. वेळापुर येथे दुपारी सत्संग पार पडला यावेळी बोलताना ज्ञानप्रचारक चांदभाई तांबोळी म्हणाले सदगुरु हरदेवसिंहजी महाराज यांनी ३६ वर्ष निरंकारी मिशनच्या माध्यमातून मानव कल्याणासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.विश्वबंधुत्वाची संकल्पना साकार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले,त्याच्या विचाराचे अनुकरण केल्यानेच त्यांना खरी श्रंध्दाजली अर्पण होईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिक्य माने,मेघा ठोंबरे शिवाजी दणाणे आदीनी परीश्रम घेतले,सदर उपक्रमासाठी युनिट ८२५ चे सेवादल व अकलुज ब्रँन्च परीसरातील बहुसंख्य निरंकारी अनुयांयी उपस्थित होते.
0 Comments