आ.बबनदादा शिंदे यांची माढा नगरपंचायतीच्या विविध कामांसाठी 10 कोटी निधीची मागणी
माढा हे तालुक्याचे ठिकाण असून सध्याचे तहसील कार्यालय सर्वसाधारणपणे दीडशे वर्षाच्या ब्रिटिशकालीन जुन्या इमारतीत आहे तसेच इतर कृषी व भूमी अभिलेख यासह इतर शासकीय कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यातील काही कार्यालये भाडेतत्वावर घेतलेली आहेत. एकूण प्रशासकीय कामकाजाचा आवाका पाहता सध्याची तहसील कार्यालयाची इमारत कामकाज करण्यासाठी अपुरी पडत आहे त्यामुळे माढ्यात प्रशासकीय इमारतीची नितांत गरज आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. तसेच माढा शहरातील विविध विकास कामासाठी व शहरातील पाणीपुरवठा पाईपलाईन करिता निधीची गरज आहे. माढा शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नगरपंचायतची इमारत खूपच जुनी असल्यामुळे पावसाळ्यात काही ठिकाणी भिंतीमधून व स्लॅबमधून पाणी पाझरते त्यामुळे कामकाजात अडचणी येतात. याचबरोबर शहरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फारच जुनी झाल्याने ती सतत लिकेज होते ती बदलणे आवश्यक आहे म्हणून या सर्व विकास कामाकरीता अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद होण्याकरिता आ. बबनराव शिंदे यांनी संबंधित मंत्री महोदयांना पत्र देऊन चर्चा करून आग्रही मागणी केली आहे.
0 Comments