वृक्षसंवर्धन काळाची गरज विषयावर पत्रलेखन, वृक्षसंवर्धनची प्रतिज्ञा सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये
दि. 22/02/2020 रोजी वृक्षसंवर्धन समिती बार्शी, राधेकृष्ण बहुउद्देशीय मंडळ यांच्यावतीने "वृक्ष संवर्धन काळाची" गरज याविषयी पत्रलेखन स्पर्धा सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये घेण्यात आली. यावेळी वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी वृक्ष संवर्धनाबद्दल माहिती दिली त्याचबरोबर उदयकुमार पोतदार यांनी पत्रलेखनविषयी महत्त्व सांगितले . सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय प्रशांत कोल्हे सरांनी मुलांना मार्गदर्शन केले . तसेच वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने लातूर रोडवर झाडे लावली तर आमच्या शाळेतील काही मुलं जबाबदारी घेतील असे त्यांनी सांगितले. पत्रलेखन चळवळीसाठी जागतिक टपाल दिनादिवशी सर्व मुले एकत्र पत्र लिहितील अशी ग्वाही सरांनी दिली पत्रलेखन स्पर्धा घेण्यासाठी शाळेतील मराठी विभागाचे सचिन मांडवकर सरांचे सहकार्य लाभले 200 विद्यार्थ्यांनी पत्रलेखन स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक शाळेत वृक्षसंवर्धनची प्रतिज्ञा घेण्याचा मानस आहे. वृक्षसंवर्धनामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे.त्याचबरोबर विद्याथ्यांचा सुद्धा सहभाग महत्त्वाचा आहे.आत्तापासुन विद्याथ्यांना झाडाचे महत्त्व समजावे हाच उद्देश आहे.विद्याथ्यांनी सुंदर अक्षरांमध्ये पत्र लिहिले शाळेच्या वतीने उदयकुमार पोतदार व उमेश काळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बार्शी पोस्टऑफिसचे उपविभागिय डाकअधिकारी अमितजी देशमुखसर, शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते .
0 Comments