रंगभरण स्पर्धेत १८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
सोलापुर—* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १८ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहीती सुनिल चव्हाण व जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे यांनी दिली. ही रंगभरण स्पर्धा शाळास्तरावर चार गटात घेण्यात आली.स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष आहे.पहिली—दुसरी गट पहिला,तिसरी—चौथी गट दुसरा,पाचवी—सहावी गट तिसरा,सातवी—आठवी गट चौथा या चार गटात ही स्पर्धा पार पडली.प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ दोन असे प्रत्येक गटातुन पाच यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत उल्लेखनीय शाळांचाही सन्मान करण्यात येणार आहे.स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येनार आहे.या स्पर्धेसाठी जगप्रसिद्ध किर्तीचे चित्रकार नितीन खिलारे व उमेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले.गड—किल्यांवर आधारीत विषय देऊन शिवरायांच्या कार्यांना उजाळा देण्यात आला. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शहराध्यक्ष संतोष भद्रशेट्टी,अनिल गायकवाड,दिपक डांगे,राजकिरण चव्हाण,प्रकाश बाळगे,प्रदीप सातपुते,विशाल पवार,सिद्वेश्वर पवार,नितीन भांगे,धन्यकुमार स्वामी,हणमंत भोसले, नारायण पवार,संतोष रजपुत,किरण गाटे,अतुल नारकर,महेश केवटे, अनिरुद्ध सुर्वे,निलेश पवार,वजीर शेख,अजय जाधव,सचिन करंडे, यांनी प्रयत्न केले.
0 Comments