राज्यस्तरीय घनकचरा व्यवस्थापन व टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा प्रकल्पासाठी विद्याभवन हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कळंब (प्रतिनिधी) राज्यस्तरीय टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे ही स्पर्धा प्रकल्प स्काय साय क्यू पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात आली होती. राज्यातून या स्पर्धेसाठी उपक्रम ,वस्तू, भित्तीपत्रक पाठविण्यात आले होते त्यातून राज्य स्तरासाठी दीडशे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्याभवन हायस्कूल कळंब दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कुमारी वैष्णवी शिवाजी लांडगे इयत्ता (सातवी अ) या विद्यार्थिनीने टाकाऊ वस्तु पासून स्टूल तयार केला तर प्रगती राजेंद्र जाधव (सातवी अ)या विद्यार्थिनीने चप्पल स्टँड तयार केले. राज्यस्तरीय उपक्रम समन्वयक शिक्षक, उपक्रमशील शिक्षक सोपान जयसिंग पवार व विज्ञान सहशिक्षक विनोद रामराव सागर यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. पर्यावरण रक्षणासाठी वस्तू तयार करताना त्या कशा तयार कराव्यात, व त्यांचा मानवी जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल येईल. पर्यावरणातून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे फायदे व पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक पवार व्ही .एस,यांनी प्रगती राजेंद्र जाधव, वैष्णवी शिवाजी लांडगे यांचा राज्यस्तरीय प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपक्रम समन्वयक शिक्षक सोपान जयसिंग पवार यांचाही राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, अध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब बारकुल, प्रशालेचे मुख्याध्यापक पवार व्ही एस, उपमुख्याध्यापिका धाबेकर आर बी, पर्यवेक्षक शरद खंदारे सुनील बारकुल, संभाजी गिड्डे, ज्योतीराम सोनके, मयाचारी व्ही.एस, दत्तात्रय पवार, आनंद रामटेके, गंगाधर डबे, सतीश कानगुडे, शरद टोम्पे, शहाजी माने, विशाल पवार ,अकबर शेख, सुशील तीर्थकर ,किरण माने, दत्तात्रय नलावडे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
0 Comments