Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठवाडा ऍग्रो शेतकरी कंपनी दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानाचा बळीराजा सन्मान प्रदान करण्यात आला

मराठवाडा ऍग्रो शेतकरी कंपनी दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानाचा बळीराजा सन्मान  प्रदान करण्यात आला .


कळंब / येथील मराठवाडा ऍग्रो शेतकरी कंपनी दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानाचा बळीराजा सन्मान 2020 हा पुरस्कार मुंबईत एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. यावेळी कंपनीचे अध्यक्ष बालासाहेब गीते यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व महेश म्हात्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला मराठवाड्यातील अतिमागास उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील अडचणींचा डोंगर पार करीत ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दोनशेपेक्षा जास्त गावात रोजगाराची निर्मिती उपलब्ध करून दिली आहे बालासाहेब गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठवाडा दूध या माध्यमातून केलेली दुग्ध क्रांती कौतुक व अनुकरणाचा विषय असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी बोलताना म्हणाले त्यांनी हा प्रोजेक्ट मराठवाड्यात विशेष प्रकल्प राबवण्यात मोठ्या अडचणी येतात त्यामुळे प्रकल्प पूर्ण होत नाही याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी गीते यांनी केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments