समाज परिवर्तनासाठी मूलभूत लिहीणे व बोलणे गरजेचे :- साहित्यिक शरद गोरे
माढा ( वृत्त सेवा):- समाजाचं परिवर्तन होण्यासाठी मूलभूत लिहील व बोललं गेलं पाहिजे. देशाची संस्कृती ही शिवसंस्कृती आहे. तीच कृषी व ग्रामीण संस्कृती आहे. असे प्रतिपादन साहित्यिक शरद गोरे यांनी केले. ते खैराव ता माढा येथे १६ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक दशरथ यादव हे होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या साहित्य संमेलनाचे उद्घाटन इस्त्रोचे शास्त्रज्ञ तथा साहित्यिक एस डी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष साहित्यिक शरद गोरे, आ.बबनराव शिंदे, स्वागताध्यक्ष दादासाहेब साठे, निमंत्रक सुहास पाटील जामगावकर, कवी फुलचंद नागटिळक, पां. न. निपाणीकर, अ.भा. साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन चवरे, प्रा. सुभाष नागटिळक, दिनेश जगदाळे, प्रा. काकासाहेब देशमुख, संतोष चव्हाण, हर्षल बागल आदी उपस्थित होते. पुढे शरद गोरे म्हणाले कि, ग्रामीण भागातील समस्या साहित्यात कमी प्रमाणात उमटतात. देशाचा कणा असलेल्या शेतकर्यावर केवळ तीन टक्के साहित्यात लिहीले गेले आहे. नुसत ललित लिहून चालणार नाही तर समाजाच परिवर्तन होण्यासाठी मूलभूत लिहील व बोललं गेलं पाहिजे. देशाची संस्कृती ही शिवसंस्कृती आहे. तीच कृषी व ग्रामीण संस्कृती आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असणारा भागवत सांप्रदाय देशाला समानता शिकवतो. त्यात अनिष्ट चाली रिती, रुढी परंपरा नाहीत. दांभिकता संपविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुकोबाय समजले पाहिजेत. दशरथ यादव म्हणाले कि,साहित्याचा संबंध ग्रामीण मातीतील माणसाशी असतो. अनेक मोठी माणसं व साहित्यिक हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात वारंवार साहित्य संमेलन झाली पाहिजेत. साहित्य संमेलने ही प्रबोधनाचा जागर असली पाहिजेत. सध्या समाजात श्रध्दा आणि अंधश्रद्धा याची गल्लत होत आहे. ज्यावेळी अशी गल्लत होते तेव्हा समाज सशक्त होत नाही. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे काम मोठे आहे. पण त्यात आता लांडगे घुसलेत. अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखे बाजूला काढले पाहिजे. संत तुकारामांना अभिप्रेत समाज आजही निर्माण झाला नाही. आपला इतिहास आपणच लिहीला पाहिजे त्यासाठी दलालांची काय आवश्यकता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खर्याचा शोध घेण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे. यावेळी उद्घाटक एस डी नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात आ बबनराव शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. जलतज्ञ अनिल पाटील, माढ्याच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे, पत्रकार कृष्णकांत चव्हाण, संभाजी मोटे, अक्षय गुंड यांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष दादासाहेब साठे यांनी केले. यावेळी कथाकथन, कविसंमेलन पार पडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील, प्रताप नागटिळक यांनी केले. संमेलनासाठी सरपंच अश्विनी नागटिळक, पंडितराव पाटील, बी. आर पाटील, बाळासाहेब पाटील, धनाजी नागटिळक, संदीपान नागटिळक, शरद नागटिळक, समाधान नागटिळक, नितीन नागटिळक, गणपत साठे, औदुंबर पाटील, नितीन नागणे यांनी परिश्रम घेतले.

0 Comments