Hot Posts

6/recent/ticker-posts

दहा हजार शिवप्रेमींनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

दहा हजार शिवप्रेमींनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

सोलापूर : महाराष्ट्रात कुठे निघत नाही अशा शिवजयंतीदिनी भव्य अन् दिव्य मिरवणूक असते. ग्रामीण भागातील शिवप्रेमी खास मिरवणूक पाहण्यासाठी सोलापुरात येतात. शिवाय सकाळपासून बंदोबस्तात असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आपली क्यूटी चोखपणे पार पाडत असतात. या शिवप्रेमींची तारांबळ होऊ नये आणि उपाशीपोटी गावी न जाता त्यांच्या पोटात दोन घास पडावेत यासाठी मंडळाचे सल्लागार तथा नगरसेवक अमोल शिंदे आणि संकेत पिसे यांनी ही संकल्पना सुरु केली.


शिवजयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील शिवप्रेमी अन् बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवभोजन देऊन थोरला मंगळवेढा तालीम मंडळाने बुधवारी शिवछत्रपतींना अनोखे अभिवादन केले. 'नो डिजिटल-नो डीजे'चा संदेश देत मंडळाच्या या शिवभोजन उपक्रमात १० हजार शिवप्रेमींसह बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शाही भोजनाचा आस्वाद घेतला. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात जेव्हा हजारो मंडळी जेवणासाठी येतात तेव्हा भाजी, चपाती अन् भात हे मेन्यू पाहावयास मिळतात, परंतु यास फाटा देत जसा एखाद्याच्या घरी शाही कार्यक्रम असतो, अगदी त्याच पद्धतीने थोरला मंगळवेढा तालीम मंडळाने शाही शिवभोजनाचा आस्वाद शिवप्रेमींना मिळवून दिला. बुधवारी रात्री ७ वाजता महापौर श्रीकांचना यन्नम, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते शिवभोजन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजय भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, मनपा आयुक्त दीपक तावरे, ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक अमोल शिंदे, संकेत पिसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आलेल्या प्रत्येक शिवप्रेमींची आस्थेने चौकशी करीत 'जेवण झालं का? नसेल तर करून घ्या' अशी विनंतीही अमोल शिंदे, संकेत पिसे हे करताना दिसत होते.


या उपक्रमाचे माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे, नगरसेवक देवेंद्र कोठे, कोल्हापूरचे माजी महापौर सागर चव्हाण, चेतन नरोटे, विनोद भोसले, दशरथ कसबे, पुण्याचे उद्योगपती रणजित जगताप, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, उद्योजक दत्ता मुळे, माऊली पवार, संतोष पवार, अजित गायकवाड, राजन जाधव, राम गायकवाड, प्रकाश वानकर, इम्तियाज कमिशनर, समीर लोंढे आदींनी कौतुक केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत पिसे, सागर पिसे, प्रकाश अवस्थी, बाळासाहेब बारगजे, अनंत येरंकल्लू, दत्ता खुर्द, महेश खुर्द, गिरीराज शेंगर, प्रकाश ओरादी, अमोल कदम, संतोष माळी, महेश गायकवाड, वीरेश गणेचारी, सतीश इंगळे, सागर मुळे, खलील शेख, बाबा शेख, कोळेकर, विनोद कदम, किरण जाधव आदींनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments