ग्रामीण पोलीस विभागाच्या टपाल प्रणालीचे पालकमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून कौतुक
ग्रामीण पोलीस कार्यालयाने राबविलेल्या टपाल निर्गतीकरण योजनेचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कौतुक केले. अशाप्रकारे इतर विभागांनी या प्रणालीचा अवलंब करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना या प्रणालीबाबत सादरीकरण करण्यास पालकमंत्री यांनी बैठकीत सांगितले. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सलग पाच तास आढावा बैठक घेतल्या त्यांनी सोलापूर महापालिका, पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय, सहकार, कृषि, वस्त्रोद्योग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचा सादरीकरणाव्दारे माहिती घेवून आढावा घेतला.
0 Comments