Hot Posts

6/recent/ticker-posts

सहयाद्री फार्मसी कॉलेज येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

सहयाद्री फार्मसी कॉलेज येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी



सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पालक प्रतिनिधी  मनोहर पांडुरंग गोसावी यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार श्रीफळ अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. गाडगे बाबा यांनी स्वच्छतेचा प्रसार जनजागृती करण्यासाठी स्वत: हातामध्ये झाडू घेतला होता. यावेळी विविध विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी आपली मनोगते व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. . बी. डोके डॉ. आर. एस. बाठे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. हिरवे, प्रा. बी. बी. गरंडे, प्रा. आर. एम. कोळी, प्रा. पी. व्ही. धसाडे यांचे इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.
Reactions

Post a Comment

0 Comments