Hot Posts

6/recent/ticker-posts

11 दिवसात कोसळेल ठाकरे सरकार - नारायण राणे

11 दिवसात कोसळेल ठाकरे सरकार  - नारायण राणे 


राज्यातील एकूण घडामोडी पाहता हे सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे राणे म्हणाले. पण मी त्यांच्यासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का? हे माध्यमांनी पाहावं पण मला वाटत हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असं भाकीत नारायण राणेंनी केलंय. हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही, विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत फक्त आश्वासन दिली. पण पूर्तता करण्याची क्षमता ना मुख्यमंत्री, ना या सरकारमध्ये आहे. फक्त सत्तेसाठी व पदासाठी व सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता एकत्र आलेली ही मंडळी असल्याचा घणाघाती आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.  भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी महाविकासआघाडीचं सरकार अकरा दिवसांत पडेल, असं भाकीत केलंय. 

Reactions

Post a Comment

0 Comments