Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वांना न्याय मिळवून देण्यात पत्रकारांचा वाटा महत्त्वाचा : आ. देशमुख



सर्वांना न्याय मिळवून देण्यात पत्रकारांचा वाटा महत्त्वाचा : आ. देशमुख


सोलापूर :  सत्तेशिवाय विकास आणि संरक्षणाशिवाय लढाई करणारा समाजातील महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार असतो. राष्ट्र हितासाठी समाजातील समस्या जाणून घेऊन सर्वांना न्याय मिळवून देण्यात पत्रकारांचा महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त विकासनगर येथील कार्यालयात आयोजित पत्रकारांच्या सत्काराप्रसंगी आ.देशमुख बोलत होते. यावेळी यावेळी दक्षिणचे उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. आ.देशमुख पुढे म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या गावातील, जिल्ह्यातील वैभवाची माहिती प्रसारमाध्यमातून जनतेपर्यंत पोहचवाव्यात. तेथील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन मला सांगाव्यात, मी माझ्या पद्धतीने त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. पत्रकारांसह सर्वांचा सकारात्मक पाठिंबा मिळत राहिला तर सोलापूर जिल्ह्याचा निश्‍चित विकास होईल आणि जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये नेण्याचे हे ध्येय लवकरात लवकर गाठणे शक्य होईल. यावेळी आ. देशमुख यांच्या हस्ते पत्रकार शामराव जोशी, राजु वारे, अमोगसिद्ध मुंजे, संजीव इंगळे, शिवदास वाडकर, दिनकर नारायण, अशोक सोनकटले, नितीन वारे, राजू काळ आदींचा सत्कार करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments