Hot Posts

6/recent/ticker-posts

दलित पँथरच्यावतीने जे एन यु मध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

दलित पँथरच्यावतीने जे एन यु मध्ये डाव्या विचारांच्या
विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध




दलित पँथरच्यावतीने जे एन यु मध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध  करण्यात आला . दलित पँथरच्या केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी हा निषेध केला .पुण्यात दलित पँथरच्यावतीने आयोजित निषेध सभेत हि निषेध करण्यात आला . या निषेधांमध्ये दलित पँथरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब पडवळ , राष्ट्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , पुणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र वाघमारे , जनसंपर्कप्रमुख जनार्दन घायमुक्ते , पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सोनाली धूनगर , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष गायकवाड , राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्रीकांत लोणारे व गणेश लांडगे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी दलित पँथरच्या केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी सांगितले कि , जे एन यु मध्ये जो निर्घृण प्रकार घडला . तो अंत्यत निषेधार्थ आहे . एवढेच नाही तर या देशातल्या लोकशाहीवरच प्रश्न उभा राहिला एवढा गंभीर आहे . विदयार्थ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत . या दहशत व मारहाणीची तातडीने चौकशी करून आरोपीना कडक शासन व्हायची मागणी दलित पँथरच्यावतीने करण्यात आली . सर्व आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्य बरोबर आम्ही संघर्षासाठी कटिबद्ध आहोत . दलित पँथर या आंदोलनात उतरेल . अशी रणनिती या बैठकीत ठरविण्यात आली
Reactions

Post a Comment

0 Comments