कोळेगाव जि.प प्राथमिक शाळेत फुलला बाल आनंदाचा बाजार
कोळेगाव शाळेत बाल आनंद बाजार फुलला जि प प्राथमिक शाळा कोळेगाव ता .मोहोळ या शाळेमध्ये विविध उपक्रTमांची नेहमी रेलचेल व विविधता दिसून येते या शाळेमध्ये काल मुलांना सर्व क्षेत्रातील विविध अनुभव व व्यवहार ज्ञान यांचे ज्ञान व्हावे म्हणून विविध उपक्रम राबविले जातात तेव्हा आज शाळेमध्ये मुलांना त्यांच्या बौद्धिक ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञान देखील आले पाहिजे व ते येण्यासाठी त्यांना त्यांचा प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून कोळेगाव शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून आज बाल आनंद बाजार हा उपक्रम शाळेमध्ये भरवला या सर्व बाजारात मुलांनी किराणा दुकान चहाचे स्टॉल भाजीपाला कापड दुकान फळविक्रेते असे अनेक स्टॉल या बाल आनंद बाजारात मांडण्यात आले या बाल आनंद बाजाराचे उद्घाटन गावचे सरपंच शशिकांत वाघमोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी वाघमोडे व उपाध्यक्ष शंकर वाघमोडे तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळू लवटे व उपसरपंच अमोल कापुरे व गावातील सर्व पदाधिकारी व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते या बाजारात गावातील सर्व नागरिक व महिलावर्ग यांनी 15 हजार 600 रुपये किमतीचा व्यवहार झाला या बाजारातील सर्व व्यवहार मुलांनी स्वतः केला या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर गुरुजी दिलीप मोकाशी गुरुजी व दत्तात्रय लाळगे गुरुजी तसेच चव्हाण मॅडम दोडतले मॅडम गुरव मॅडम व पाचोरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे अगदी योग्य नियोजन केले

0 Comments