आजचे पालक, जागृत पालक - स्वरुपाराणी
आजचे पालक हे जागृत पालक असे प्रतिपादन स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी केले. त्या महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंत नगर येथे पालक सभेत पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या जुन्या काळी आर्थिक, सामाजिक, परिस्थिती वेगळी होती. पालकांनी आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, मुलांना भौतिक सुविधा द्या तसेच पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. सांस्कृतिक व क्रीडा विभागातील प्रगतीबद्दल त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी प्रवीण स्वामी सर यांच्या हस्ते कै.शंकरराव मोहिते पाटील आणि आक्का साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात प्रशालेचे मुख्याध्यापक भारत एकतपूरे यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षक-पालक समन्वय महत्त्वाचा आहे. तसेच शालेय उपक्रम पालकांना माहीत होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले.
प्रशालेचे सभापती नितीन राव खराडे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल गैरवापरामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे आणि शाळेच्या शिस्तीचे पालन करावे असे प्रतिपादन केले. आपल्या व्याख्यानामध्ये प्राध्यापक प्रवीण स्वामी यांनी पालकांनी शाळेतील शिक्षकांशी संपर्क करून आपल्या विद्यार्थ्यांची चौकशी करावी तसेच आपण आपल्या मुलाला किती वेळ देतो याचे आत्मचिंतन करावे.
पालक सभा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख सुभाष मुंडफणे, अमोल फुले, चिंचकर सर, कानबूर मॅडम यांनी परिश्रम घेतले. सभेचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.

0 Comments