केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी करून घ्यावे, सोलापूर शहर युवक काँग्रेसची मागणी
सोलापूर:- दिनांक 6 जानेवारी 2020 केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी करून घ्यावे या मागणी साठी आज रोजी सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांच्याकडे निवेदन दिले.सोलापूर शहर युवक काँग्रेस च्या वतीने या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिमाखदार सोहळा पार पडतो. या सोहळ्यामध्ये भारताचे संरक्षण दले शस्त्रास्त्रांसह शक्तिप्रदर्शन करतात तसेच विविध राज्यांचे चित्ररथ संचालनामध्ये सहभाग घेत आपापल्या राज्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे प्रदर्शन घडवत असतात मात्र यावर्षी महाराष्ट्राच्या चित्राचा प्रस्ताव नाकारला गेल्याने प्रजासत्ताक दिनातील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचालनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने नेहमी छाप पाडली आहे 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल आला होता. पुढे 1993/94/95 अशी सलग तीन वर्ष महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली होती. 2015 मध्ये पंढरीची वारी या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. त्यात 2018 मध्ये महाराष्ट्र ने सादर केलेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने अव्वल स्थान पटकावले होते. यावर्षी महाराष्ट्राने पथसंचलनासाठी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या संकल्पनेवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र तो केंद्र सरकारने नाकारला आहे. त्याचे कारण रोटेशन पद्धत आहे असे देण्यात आले. पण केंद्रातील मोदी सरकार 2014 पासून दरवर्षी गुजरात राज्याचा चित्ररथ सादर करण्यास परवानगी दिली आहे. केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही आणि सूडबुद्धीने महाराष्ट्र राज्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला. आम्ही आपणास अशी विनंती करत आहोत की केंद्र सरकारने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण चित्रकाराला महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक संचलनातील सहभागी करून घ्यावा ही आमची मागणी आपण केंद्र सरकारमार्फत पोहोचवावी असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सोलापूर शहर मध्य युवक अध्यक्ष योगेश मार्गम, राजासाब शेख, प्रवीण जाधव, संजय गायकवाड, श्रीनिवास चेन्नपागुल, राहुल गोयल, उमर मुकेरी, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, नागेश म्याकल, तन्वीर इनामदार, चंद्रकांत पात्रे, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, अनंत पुंडा, महेश माने, अशोक सायबोळू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments