सदभावना वंदे मातरम् मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्सव २०२०
सदभावना वंदे मातरम् मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्सव २०२० निमित्त, १४जानेवारी २०२० रोजी १0६वी व कर्नाटक राज्यातिल पाचवी भारतमाता तिरंगा स्केटींग शोभायात्रा चडचण (जि . विजयपुर), जत (जि . सांगली), अथनी (जि. बेळगावी) येथे काढण्यात आली होती राष्ट्रीय एकता उपक्रमांतर्गत, चेतक रोलर स्केटींग क्लबच्या ६0 मुलांची ही तिरंगा स्केटींग यात्रा तिनही गावाच्या गजबजलेल्या बाजारपेठेतून काढण्यात आली होती. तिरंगा हातात घेऊन मुलांनी कार्यक्रम सादर केले . यात्रेमध्ये ५ ते १५ वर्षाच्या चेतक क्लबच्या मुलामुलींनी सहभाग घेतला होता 'देशाला अधिक मजबूती देण्यासाठी व देशाच्या अखंडतेसाठी समस्त नागरिकांनी प्रजासत्ताकदिन एकजूटीने व घराघरातून साजरा करावा असे आवाहन गांधी यांनी हिंदी, मराठी, कन्नड, गुजराथी व तेलुगू भाषेतून केले . वृत्तपत्र व चॅनल प्रतिनिधींनीसुद्धा यात्रेची नोंद घेतली व ६वर्षाच्या रकेटर समृद्धि, अभिषेक, प्रणवची मुलाखात घेतली .चडचण येथे मुख्य पोलिस अधिकारी श्री महादेव येलीगर याच्या हस्ते भारतमातेची पुजा सकाळी ११वा . संपन्न झाली . साहेबांनी यात्रेच्या नियोजनासाठी खुप सहकार्य केले व एकता कार्यक्रमाची भरभरून स्तुती केली . मुलांनी हातात तिरंगा घेऊन स्केटींग करित तिरंगा कार्यक्रम सादर केला . या वेळेस गावकर्याचा अफाट समुदाय उमटला होता व लोकांनी मुलांना खाऊ, पाणी, फळ, चॉकलेट, मेडीकल पावडर वाटले तर पोलिस डीपार्टमेंट त पेन प्रेमाने व भरपूर वाटले . चडचण येथिल शाळांच्या मुलांनीसुद्धा यात्रेमध्ये सहभाग नोंदविला. जत येथिन अठवाडयाच्या बाजारातून दुपारी ४वा . यात्रा काढण्यात आली व अफाट जनसमुदायाने यात्रेचे स्वागत केले . अथनी पोलिस स्टेशन येथे कर्नाटक राज्याच्या डी आय जी साहेबांनी एकता उपकमाचे कौतुक केले व मुलांच्या क्षमतेची वाह वाह केली व प्रत्येकाशी हस्त आंदोलन करून मुलांना सफरचंद वाटले . बाजारपेठेतून संध्याकाळी ६वा . काढण्यात आलेल्या यात्रेला नागरिकांनी दुकानातून - घराघरातून बाहेर येऊन एकता उपकमास प्रतिसाद दिला . गावकर्यानी शोभायात्रेमध्ये स्वतसहभागी होऊन भारतमातेच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या व चेतक क्लबच्या मुलाच्या तिरंगा स्केटींग कार्यक्रमाचा, मनसोक्त आनंद घेतला.एकंदर सदभावनाच्या २८व्या वर्षातिल १०६वी शोभायात्रा अभुतपूर्व ठरली .तिरंगा स्केटींग यात्रेच्या प्रथम गाडीवर आकर्षक भारतमाता मुर्ती होती, त्या मागे गांधी यांची जय हिंद अनाउंसमेंट चारचाकी, व नंतर देशभक्तिपर गितांसाठी चार चाकी वाहने असा ताफा होता .भारतमाता तिरंगा यात्रेचे सुत्रसंचलन दिव्यकांत गांधी यांनी केले व कुंडलिक शिंदे, सोनल इंगळे, रोशन शेख, गणेश खेडकर, दशरथ रंगदळ, सोना गांधी, ध्रुवेश गांधी यांनी सक्रिय भाग घेतला .



0 Comments