वंचित बहूजन आघाडीच्यावतीने मुख मोर्चा काढून टेंभुर्णी शहर कडकडीत बंद
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार टेंभुर्णी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.वंचित बहुजन आघाडी टेंभुर्णीच्या वतीने आज शहरात बंद पुकारण्यात आला
टेंभुर्णी येथील व्यापाऱ्यांनी आठवडा बाजार दिवस असताना सुध्दा सदर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बंद यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. सी. ए. ए., एन. पी. आर. एन. आर. सी. लागू करू नये या कायद्याच्या निषेधार्थ बंदचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी करांनी बंद यशस्वी केला. वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम समाज बांधवांनी टेंभुर्णी शहरातुन राट्रियमहामार्ग सोलापुर-पुणे वरुण टेंभुर्णी ग्रामपंचायत येथिल अण्णा भाऊ साठे यांच्या अर्थ पुतळ्याला हार घालुन तसेच करमाळाचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालुन मुख मोर्चा काढून टेंभुर्णी येथिल आंबेडकर उद्यानात येऊन डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास हार घालुन वंचित आघाडीच्यावतीने आपले विचार भा.ज.प. सरकारच्या विरोधात मांडले या वेळी वंचित आघाडीचे युवराज वजाळे सर, वंचित चे जिल्हा महा सचिव विशाल नवगिरे , संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप ,मुस्लिम समाज्याचे हजिशब्बिर जहागिरदार ,टेंभुर्णी सामाजिक कार्यकरते गौतम कांबळे, मातंगचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे ,सकल मराठा च्या वतिने गोरख बप्पा देशमुख ,अधिकची केंद्र सरकार विरोधात भाषने झाली या वेळी टेंभुर्णी भागातील मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष विशाल दादा मिसाळ, तालुका उध्यक्ष प्रविन वाघमारे ,वंचितचे महासचिव शरद बनसोडे ,राहूल चव्हाण,मुस्लिम समाज्याचे हाजी युसुफ रस्तापुरे, कैकाडी समाज्याचे तालुका अध्यक्ष लखन माने,युवराज पाटील,सत्यवान हांडे तसेच रहीम तांबोळी,जहांगीर तांबोळी ,रफीक पठाण, रफिक शेख ,दाऊत शेख,जावेद जहागिरदार ,फिरोज तांबोळी ,जावेद मुलानी, मदनी तांबोळी ,असिफ रस्तापुरे चव्हाणवाडी चे आशिफ काझी, आविनाश लोंढे ,बाळासाहेब खरात, जुगल खरात,रणजित गायकवाड ,प्रशांत बनसोडे ,नाथा पोळ,तर या बंदला पाटिंबा देऊन मोर्चा मध्ये सामिल झाले होते.
, चोकट
आज टेंभुर्णी शहराचा आठवडा मोठा बाजार असुन बाजार साठी 27 खेड्यातुन शेतकरी येतात तसेच ऊस तोडणी कामगार ही बाजारला येतात त्यांची गैर सोय होऊनये म्हणुन आज बाजार व आति अवशक वगळता टेंभुर्णी शहर बंद ठेवण्यात आले होते मात्र आज वंचित आघाडीने हिंसक वळण न लावता कुठेही गालबोट लागोनये म्हणुन शांततेत मुखमोर्चा काढून शांततेचे आव्हान केलेल्याचे दिसुन आले*.
0 Comments