सोनी इंटर कॉलेज कॉम्पिटेशन २०२०" स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
सोलापूर :- माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर यांच्या वतीने गुरुवार दि. २३-०१-२०२० रोजी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाअंतर्गत इंटर कॉलेज कॉम्पिटेशन घेण्यात आली. या स्पर्धेसाठी सोलापूर शहरातील १४ नामवंत कॉलेजमधील एकूण २६० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एकूण पाच कॉम्पिटेशन घेण्यात आले. यामध्ये १) अॅप्टीटयूड टेस्ट २) टेक्नीकल टेस्ट ३) सी. प्रोगॉमिंग कॉम्पिटेशन ४) वेबसाईट डिझाइन कॉम्पिटेशन ५) क्विझ कॉम्पिटेशन या सर्व स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेची सुरुवात सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी दिपप्रज्वलानाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजीव कुमार मेंते विभाग प्रमुख एम. सी. ए. विभाग, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या हरदिप बोमरा , स्पर्धेचे मुख्य व कॉम्प्यूटर विभागाचे प्रमुख. नवनाथ भंडारे व स्पर्धेचे समन्वयक श्री अरविंद बगले तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. राजीव कुमार मेंते यांनी आपले मनोगतामध्ये सोनी महाविद्यालयाची प्रगती दिवसेंदिवस उंचावत आहे व येथील शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ठ असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांमधील गुणवतेत वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अशा सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा व आपले करिअर उत्तम प्रकारे घडवावे असे विद्यार्थ्यांना सांगितले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्री. जावेद बेग सर यांनी कामकाज पाहिले. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पोर्टसमन सारखे स्पिरीट विद्यार्थ्यांमध्ये असणे गरजेचे आहे. कठोर परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी होतो असे आपले मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रु. ११००/- फक्त , द्वितीय क्रमांकास रु. ७००/- आणि तृतिय क्रमांकास रु. ५०० त्याच प्रमाणे सर्टिफिकेट असे बक्षिसाचे स्वरुप होते. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत या सर्व स्पर्धा पार पडल्या आणि या स्पर्धेचा निकाल याच दिवशी दुपारी ४ वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांतजी सोमाणी , सदस्य जवाहरजी जकेटीया , प्राचार्या डॉ. वासंती अय्यर , कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख. नवनाथ भंडारे यांच्या हस्ते घोषित करण्यात आला व या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील एकूण १५ बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सदस्य श्री. जवाहरजी जकेटीया यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण, कठोर परीश्रम व खिलाडू वृत्ती असणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. कविता कटाप आणि सौ. विजयालक्ष्मी खेडकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या हरदिप बोमरा , स्पर्धा प्रमुख श्री. नवनाथ भंडारे व स्पर्धेचे समन्वयक श्री अरविंद बगले तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, बी. सी. ए. व बी.एस. सी. इ. सी. एस. विभागातील सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्यांने सोनी इंटर कॉलेज कॉम्पिटेशन २०२० उत्साहात व उत्कृष्ठरीत्या पार पाडली.
.
.
.
0 Comments