Hot Posts

6/recent/ticker-posts

मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बोगस, हा तर शिवप्रेमींचा अवमान : जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप

मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बोगस, हा तर शिवप्रेमींचा अवमान : जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावर वापरलेली शिवमुद्रा ही बोगस आणि नकली आहे. हे अपमानजक आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे.आपल्या राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक राजमुद्रा वापरणे अतिशय चुकीचे आहे. ती तत्काळ मागे घ्यावी, असा इशारा संभाजी ब्रिगेड चे पंढरपूर विभागिय जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी टेंभुर्णी येथे घेतलेल्या शिवप्रेमी ,सखल मराठा,संभाजी ब्रिगेड कार्येकर्ते बैठकीत ईशारा दिला आहे     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबद्दल शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यासह अनेक ठिकाणी राज ठाकरे यांच्याविरुध्द पोलिसांत तक्रारी देण्यात आल्या आहेत. *यापार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप म्हणाले की म्हणाले की, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या १२ व्या वर्षी राजमुद्रा दिली होती. ही राजमुद्रा विश्वाला वंदनीय आहे. ही राजमुद्रा अनुष्ठूप छंदामध्ये साकारण्यात आली होती. कॅलिग्राफी करताना विशेष काळजीही घेतली होती. या राजमुद्रेच्या आठही बाजू एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटर सटीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेश पत्रावरच ही राजमुद्रा उमटवली जायची. तिचा इतरत्र वापर झाला नव्हता. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेचा आकार वाकडा तिकडा आहे. ही राजमुद्रेची नक्कल आहे. *राज ठाकरे हे शिवप्रेमी आहेत हे आम्हाला मान्य आहे. ते आणि त्यांचे गुरू बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे जाणकार असल्याचे सांगतात. पण त्यांनी मनसेच्या झेंड्यावर वापरली जाणारी राजमुद्रा, तिची कॅलिग्राफी याबद्दलही काळजी घेतली नसल्याचे दिसते. अस्सल आणि नक्कल याच्यातील फरक राज ठाकरे यांनाही कळाला नाही याचे विशेष वाटते.* देशातील कोणत्याही राजमुद्रेला एवढा सन्मान मिळाला नाही तेवढा सन्मान छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेला मिळाला. शिवरायांच्या आज्ञापत्रावर या राजमुद्रेचे स्थान होते. काही लोक वैयक्तिक प्रेमाने आणि आदरातून आपल्या वाहनांवर, घरामध्ये राजमुद्रेचे स्टिकर लावतात. त्यांनी काळजी घेणं गरजेच आहे. पण एखाद्या राजकीय पक्षाच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरणं चुकीचं आहे. उद्या कार्यक्रम झाल्यानंतर हे झेंडे कुठेही पडू शकतात. उद्या गमज्यांवर राजमुद्रा प्रकाशित करुन ते कुणाच्याही गळ्यात घातले जातील. गळ्यात घातल्यानंतर तुमचे कार्यकर्ते ते कुठेही ठेवतील. त्यातून राजमुद्रेची आणि लाेकांच्या भावनेची विटंबना होणार आहे.  शिवसेनेची स्थापना शिवरायांचे नाव समोर ठेऊन झाल्याचा काही लोक संदर्भ देत आहे. त्यावर मत मतांतरे आहेत. पण शिवसेनेने शिवरायांची कोणतीही प्रतिकं वापरली नाहीत. झेंड्यावर राजमुद्रा वापरणं हा राजकारणाचा भाग होतोय. झेंड्यावरुन राजमुद्रा तत्काळ हटविण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र अंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही  या वेळी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पो.नि. राजकुमार केंद्रे यांना निवेदन गुरुवारी सायंकाळी  दिले असुन या वेळी जिल्हा सचिव सुहास टोणपे,माढा तालुका संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष बालाजी जगताप, ता.संघटक नितीन मुळे,टेंभुर्णी   शहर अध्यक्ष सचिन खुळे, गटप्रमुख दादासो देशमुख, गणेश गोफणे,पिंटू देशमुख, अविनाश देशमुख,  तांबवे (टें ) चे  संभाजी ब्रिगेड अध्यक्ष  तात्यासो देशमुख, चेअरमन निलेश मुसळे,भरत आटकळे,रत्नदिप आटकळे, गणेश माने,जॅकी सुर्वे,दिपक कसबे,पोपट माने ई....उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments