Hot Posts

6/recent/ticker-posts

विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न

विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न

सांगोला/प्रतिनिधी- १७ जानेवारी रोजी विज्ञान महाविद्यालय, सांगोला व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोटेवाडी (नवी) या गावात राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न झाले.  शिबिराच्या उदघाटन समारंभास उदघाटक म्हणून सांगोला पंचायत समितीच्या सभापती मा.सौ. राणीताई कोळवले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  मा.श्री. संतोष राऊत हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे, युवा  नेते प्रा. हणमंत कोळवले, प्रा पवार के.एस , लोटेवाडी गावचे सरपंच मा.श्री. सुरेश बोडरे, श्री. कांतीलाल ढेरे सर,  लोटेवाडी गावचे माजी सरपंच मा.श्री.रामचंद्र लवटे, लोटेवाडी गावचे माजी सरपंच मा.श्री. तानाजी सावंत,  ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र सरगर, प्रगतशील बागायतदार श्री. वामन विभुते, श्री.मनोहर घाडगे सर, श्री.दिपेन कुलकर्णी सर, विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामचंद्र सावंत, सौ.कुलकर्णी मॅडम, सौ. दिपाली शंकर सरगर, ग्रामपंचायत सदस्या मा.सौ. अनिता संभाजी सरगर, लोटेवाडी गावचे तलाठी रावसाहेब वाघमारे,श्री. श्रीरंग सरगर  व अनेक मान्यवर उपस्थित होते. 
        शिबिराच्या  उदघाटनाची सुरवात  संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने  झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे कार्यक्रम प्रमुख डॉ. काकासाहेब घाडगे यांनी केले. प्रास्ताविकानंतर सांगोला पंचायत समितीच्या सभापती सौ. राणीताई कोळवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी सांगितले की हे शिबीर जलव्यवस्थापन, वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छ भारत अभियान यासाठी आहे. त्यानंतर सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  मा.श्री. संतोष राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की दिवसातून आपण एखदा तरी मातीत आणि शेणात आपला हात घातला पाहिजे त्यासाठीच हे विशेष श्रमसंस्कार शिबीर आयोजित केले आहे. त्यांनी श्रमाचे अनेक प्रकार आहेत असे  सांगितले त्यातील बौद्धिक श्रम व शाररिक श्रम या बद्दल  सविस्तर मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी यांच्यानंतर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी गावातील गावकऱ्यांनी महाविद्यालयाला सहकार्य करून शिबिरातील विविध उपक्रम यशस्वी करावेत असे आवाहान केले. प्राचार्यांच्या मनोगतानंतर संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी सांगितले कि लोटेवाडी गाव हे टोकाचे गाव असले तरी इथली माणसं व त्या माणसांची विचारधारा ही पुरोगामी विचारधारा आहे म्हणून शिबिरासाठी हे गाव निवडले आहे. आभार प्रदर्शन श्री. कोडग यांनी केले. 
    शिबिराच्या उदघाट्नाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.काकासाहेब घाडगे,प्रा. नारायण आदलिंगे,  प्रा.बाळासाहेब सरगर, प्रा रावसाहेब गडहिरे, प्रा.सौ अश्विनी मिसाळ, प्रा.डॉ.सौ.सीमा गायकवाड, प्रा.अविनाश लोखंडे, श्री धनंजय गायकवाड व शिबिरातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments