Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रोहनभैय्या सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे रक्तदान शिबीर

स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रोहनभैय्या सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे रक्तदान शिबीर

अकलूज ( प्रतिनिधी) स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रोहनभैय्या सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २४जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन अकलूजमध्ये करण्यात आले असल्याचे दोस्ती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब सुरवसे यांनी दै. कटुसत्यशी बोलताना सांगितले. सदर शिबीराचे आयोजन दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले असून अकलूज इंदापूर रोड, राऊत मंगल कार्यालय, राऊत नगर येथे दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ९.००वा.ते सायंकाळी ५.०० वा .पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तर प्रत्येक रक्तदात्यास संयोजकाच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देणेत येणार असल्याचेही आण्णासाहेब सुरवसे म्हणाले. यावेळी दोस्ती ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments