अकलूजच्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचा समारोप..
अकलूज - येथिल संग्रामसिंह मोहिते-पाटील मिञ मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ यांचे विद्यमाने आयोजित केलेल्या सोळाव्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत ग्रामीण अ मुले आणि मुलींच्या दोन्ही गटात श्री हनुमान विद्यालय लवंग ने बाजी मारली. मुलांच्या शहरी गटात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज व मुलींच्या गटात जिजामाता कन्या प्रशाला अकलूज विजेते ठरले.सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंती निमीत्त दि,१८व १९ रोजी स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, स्पर्धेचे आयोजक संग्रामसिंह मोहिते-पाटील,जि.प.सदस्या कु.स्वरुपाराणी मोहिते-पाटील,किशोरसिंह माने पाटील,अॕड.नितीनराव खराडे, आ.तानाजी सावंत,महादेव अंधारे,नारायण फुले,लक्ष्मण आसबे यांचेसह विवीध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुलींच्या शहरी गटात व्दितीय क्रमांक लक्ष्मिबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,तृतीय सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी पटकाविला. मुलांच्या शहरी गटात प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,व्दितीय श्री सावतामाळी विद्यालय अकलूज,माळेवाडी यांनी तर तृतीय क्रमांक महर्षि प्रशाला,शंकरनगर यांनी पटकावला.तर ग्रामीण ब मुलांच्या गटात प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय माणकी,व्दितीय श्री चक्रेश्वर विद्यालय चाकोरे,तृतीय श्री संत तुकाराम विद्यालय बोंडले यांनी पटकाविला.ग्रामीण ब मुलींच्या गटात प्रथम क्रमांक रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील कन्या प्रशाला नातेपुते,व्दितीय श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय मांडवे,तृतीय प्रतापसिंह मोहिते-पाटील विद्यालय शिवपुरी यांनी पटकाविला. ग्रामीण अ मुलांच्या गटात द्वितीय श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय वाघोली,तृतीय श्री गणेश विद्यालय पिंपळनेर,तर मुलीःच्या गटात व्दितीय विभागुण कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर,विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय वाघोली,तृतीय श्री गणेश विद्यालय पिंपळनेर यांनी पटकाविला. उपस्थितांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह,प्रमाणपञ बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट हलगी वादक राजेंन्द्र मिसाळ,घुमके वादक महादेव गायकवाड,सनईवादक यल्लाप्पा खरडे,प्रशिक्षक भिमाशंकर पाटील यांना गौरविण्यात आले.सुञसंचलन किरण सुर्यवंशी,शकील मुलाणी यांनी सुञसंचलन केले.स्पर्धेसाठी मिञमंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.स्पर्धेत आठ गटातून एकुण ५४ संघाचा सहभाग होता.
0 Comments