भक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने, उखाणे स्पर्धा संपन्न.
कुर्डुवाडी- जिजाऊ जयंतीनिमित्ताने हळदी-कुंकू तसेच उखाणे स्पर्धेचे आयोजन,भक्ती सामाजिक संघटना कुर्डुवाडी यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः जिजाऊ प्रतिमेचे पूजन तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक-अनिता अनंतकवळस, द्वितीय क्रमांक-आरती कराडे तृतीय क्रमांक-साळुबाई सुरवसे तसेच उत्तेजनार्थ तीन बक्षीसे देण्यात आली. यानंतर उपस्थित महिला मधून लकी ड्रॉ कुपन काढून, पाच भाग्यवान विजेत्यांना विविध भेट वस्तू देण्यात आल्या. यानंतर मुख्य कार्यक्रम हळदी-कुंकूसह तीळगूळ वाटप करण्यात आला. एक सामाजिक उपक्रम म्हणून यावेळी महिलांना तुळशी, गुलाब ,तसेच विविध प्रकारची वृक्षरोपे महिलांना वाण म्हणून देण्यात आली. या स्पर्धेच्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी अनुराधा जगन्नाथ क्षीरसागर होत्या.तर प्रमुख उपस्थिती म्हणून,साधना करंदीकर,सविता भांडवलकर, अनुराधा गवळी डॉ. नलावडे ,डॉ.अश्विनी काळे. दिपाली काटे, वायकुळे,सुशीला सातव, सुनिता पांढरे, मेघा कोंडबळे तसेच शिक्षिका सोनिया टमके या होत्या. विविध स्तरातील मान्यवर, तसेच मोठ्या प्रमाणात महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सुत्रसंचलन स्मिता कुलकर्णी यांनी केले तर आभार भारती हरीश भराटे यांनी मानले.
0 Comments