Hot Posts

6/recent/ticker-posts

धनलक्ष्मी महिला पतसंस्थेने महिलांना आर्थिक सक्षमता दिली : संगिता धांडोरे

धनलक्ष्मी महिला पतसंस्थेने महिलांना आर्थिक सक्षमता दिली  : संगिता धांडोरे


सांगोला ( जगन्नाथ साठे) -: धनलक्ष्मी महिला पतसंस्था कोळा, या पतसंस्थेने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे, महिलांच्या एकजुटीने चालणारी ही पतसंस्था महिलांसाठी प्रेरणादायी कार्य करीत आहे, या पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन समाज कल्याण सभापती संगिता धांडोरे यांनी व्यक्त केले. कोळा येथील धनलक्ष्मी महिला पतसंस्थेने नुतन सभापतींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता, या वेळी त्या बोलत होत्या.
    या वेळी व्यासपीठावर नूतन कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे, सांगोला पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले, जिल्हा परिषद सदस्य ऍड सचिन देशमुख, कुंडलिक आलदर,कोळा अर्बन बँकेचे व्यवस्थापक आनंदा सरगर, मारुती सरगर, संगम धांडोरे, सचिन धांडोरे, धनलक्ष्मी बँकेच्या चेअरमन प्रियांका आलदर,व्हाईस चेअरमन वैशाली आलदर,राजमाता पतसंस्थेचे चेअरमन कुंडलिक आलदर सर,वैभव देशमुख,सांगोला साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र देशमुख, माजी पोलीस पाटील शंकर मोरे,अहिल्या पतसंस्थेचे व्यवस्थापक साखरे साहेब,रमेश कोळेकर,संचालक ज्योती कोरे, प्रभाकर वाले,ज्येष्ठ नेते विलास देशमुख,ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव देशमुख (सर)घेरडे साहेब,संचालक भगवान घेरडे,पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर,श्रीमंत सरगर,बापू आलदर (पुढारी), समाधान सरगर,अण्णा आलदर, अण्णा सलगरे,साहेबराव गुंडाळे,बालू आलदर,संदीप पाटील, युवा नेते संतोष कारंडे,गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी नूतन कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे म्हणाले की, जिल्हा परिषदेमधील कोणत्याही प्रकारचे काम असो त्या कामाची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी राहील.नक्कीच लोकांची कामे मार्गी लावण्यास माझ्याकडून प्रयत्न केला जाईल,कामात पारदर्शकता आणण्यासाठी आपण प्रयत्न करणारअसून सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे सांगून ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या धनलक्ष्मी महिला पतसंस्थेचे कौतुक केले. तर नूतन सभापती राणीताई कोळवले यांनी या सत्काराने आपण भारावून गेलो असल्याचे सांगून पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचणार असल्याचे सांगितले. यावेळी संगम धांडोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
           या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलिक आलदर यांनी केले, तर आभार मारुती सरगर यांनी मानले.  यावेळी पतसंस्थेचे सभासद, व्यवस्थापक, खातेदार, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय जगताप,क्लार्क श्रीमती कुंभार, विश्वास कचरे,आदींनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments