Hot Posts

6/recent/ticker-posts

घेरडी-वाणीचिंचाळे येथे खंडोबा देवाची यात्रा संपन्न.

घेरडी-वाणीचिंचाळे येथे खंडोबा देवाची यात्रा संपन्न..


     वाणीचिंचाळे येथे खंडोबा देवाची यात्रा विविध  धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाली.आज सकाळी झालेल्या यात्रेला अनेक भाविकभक्तांनी शेखमळा येथे असलेल्या मंदिर परिसरात गर्दी केली होती. हिंदू मुस्लिम समाजातील अनेक लोक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.खंडोबा देवाची वाणीचिंचाळे गावातील अनेक वर्षांपासून मुस्लिम बांधव पुजापाठ व अनेक धार्मिक विधी करतात. अशा प्रकारे एक सामाजिक ऐक्याचे दर्शन देणारी हि यात्रा पंचक्रोशीत ओळखली जाते.
                       यावेळी रात्री उशिरापर्यंत संगीत भारुडांची जुगलबंदी यात्रा कमेटीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक सामाजिक विषयावर या भारुडाच्या माध्यमातून प्रहार करण्यात आला. यानंतर ठिक 12 वा भाकणुकीचा कार्यक्रम झाला. तसेच भाकणुकीमध्ये अनेक गोष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच पाऊस, राजकारण, रोगराई यावर मंदिराच्या पुजारी लोकांनी आपल्या भाषेतून सांगितले.
             आलेल्या सर्व भाविकांना यात्रा कमेटीच्या वतीने खिरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व महीलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
Reactions

Post a Comment

0 Comments