अकलूज येथे एस.पी.एम.स्पोर्टस् चॅम्पियनशिप चे आयोजन...
अकलूज (तालूका प्रतिनीधी) विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन त्यांच्या मध्ये खिलाडूवृत्ती तयार व्हावी,संस्थेमधून राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडावेत या हेतुने शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दि.२६ते २८ जानेवारी या कालावधीत एस.पी.एम.स्पोर्टस् चॅम्पियनशिप २०२० चे आयोजन केले
असल्याची माहीती संस्थेच्या संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी दिली.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात आयोजीत केलेल्या पञकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली.या वेळी संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,मुख्याध्यापक संजय गळीतकर,सादिक झारेकरी आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वरुपाराणी म्हणाल्या,या स्पोर्टस् चॅम्पियनशिपचे तिसरे वर्ष असून या वर्षि या स्पर्धेत खो-खो व कब्बडी या दोन खेळाचा समावेश आहे.या साठी प्राथमिक,१४वर्ष,१७वर्ष,१९वर्ष व खुला अशा पाच गटातून खो- खो साठी १२८संघातून १५३६ खेळाडू तर कब्बडी साठी १३७ संघातून १६४४ खेळाडू असे एकुण १५३६ संघातुन ३१८०मुले मुली खेळाडू सहभागी होणार आहेत,या साठी १६ मैदाने व ५२ पंच काम पाहणार आहेत. दि,२६ जानेवारी रोजी क्रीडा संकुल येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असून याचे ध्वजारोहण व स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थित होत आहे.या वेळी संस्थेच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवर यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. याच वेळी संस्थेतील सुमारे ६७४९विद्यार्थी सामुदाईक कवायती करणार आहेत.तर विवीध पथकाचे नेञदिपक संचलन ही होणार आहे.
एकुण १५ हजार विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. स्पर्धेसाठी आयोजक व संस्थेचे संचालक संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवीध २२ समित्या नियोजनबध्द कार्यरत असल्याचे ही स्वरुपाराणी म्हणाल्या.पुढील वर्षी या स्पर्धा दिवाळी पूर्वी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. स्पर्धेसाठी ५१ शाखांनी रंगीत ध्वज,खेळाडूंना स्पोर्टस् किट देण्यात आले असून विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे सामणे पाहण्या साठी मोफत प्रवेश ठेवला असून महिला व पुरुषांची स्वतंञ बैठक व्यवस्या केली आहे.तर आरोग्य,पिण्याचे पाणी सुविधा ही उपलब्ध केली आहे.
0 Comments