Hot Posts

6/recent/ticker-posts

पल्स पोलिओ मोहिमेतील अडचणी दूर करु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पल्स पोलिओ मोहिमेतील अडचणी दूर करु
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
           

पुणे,दि. १९: पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
                 जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आलायावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात पाच वर्षाखालील बालकांना श्री. पवार यांच्या हस्ते पोलिओचा डोस देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरेआरोग्य विभागाचे सभापती प्रवीण मानेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधवजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकरआरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक संजय देशमुखजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.
                उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेदेशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी सामूहिक असून निरोगी पिढी घडवण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पोलिओचा एकही रुग्ण राहणार नाहीयासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. भविष्यातही पोलिओचा रुग्ण आढळू नयेम्हणून लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.
                ही मोहीम आपल्या सर्वांची मोहीम असून ती राबवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,अशी ग्वाही देवून त म्हणालेया मोहिमेदरम्यान प्रवासात असणाऱ्या बालकांना बस स्टॅन्डरेल्वे स्टेशनटोलनाका अशा गर्दीच्या ठिकाणी देखील पोलिओची लस दिली जाणार असून एकही बालक पोलीओ लसीकरणापासून वंचित राहू नयेयासाठी पालकांनी प्रशासनाला प्रतिसाद द्यावाअसे आवाहन त्यांनी केले.
                जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले,  देशात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सुरु आहे. पुणे जिल्ह्यात 1999 पासून पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.  माहितीशिक्षण व संवाद या माध्यमातून हे अभियान  यशस्वी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ११ लाख ११ हजार ३३४ बालके या लसीकरणासाठी अपेक्षीत लाभार्थी असून यासाठी सहा हजाराहून अधिक बुथद्वारे लसीकरण करण्यात येत आहे.  गृहभेटी द्वारे पुढील पाच दिवस राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम सुरु राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
                 डॉ. अशोक नांदापूरकर प्रास्ताविकात म्हणालेजागतिक आरोग्य संघटनेने 27 मार्च 2014 मध्ये आपला देश पोलिओमुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे. तथापि काही शेजारील देशात अजूनही तुरळक प्रमाणात पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे या रुग्णांपासून पोलिओ विषाणू आपल्या देशात दाखल होऊ नयेयासाठी खबरदारी म्हणून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 19 जानेवारी 2020 या दिवशी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना बुथवर तर  या दिवशी वंचित राहिलेल्या बालकांना 21 जानेवारी 2020 पासून ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस पथकाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जाणार आहे. त्याचबरोबर दुर्गम भागवाड्या-वस्त्यांवर तसेच ऊसतोडवीटभट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांना मोबाईल पथक व नाईट पथकाद्वारे देखील लसीकरण करण्यात येणार आहेअसे ते म्हणाले.
                कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बालकपालकआरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments