Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रश्न उभा राहिला की गांधी उत्तर घेऊन उभे रहातात

प्रश्न उभा राहिला की गांधी उत्तर घेऊन उभे रहातात


अकलूज  येथील  शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज राज्यशास्त्र विभाग व इंग्रजी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व्याख्यानात,  प्रश्न उभा राहिला की गांधी उत्तर घेऊन उभे राहतात असे  मत युनिक अकॅडमी पुणे येथील सतिष देशपांडे यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  जयसिंह मोहिते-पाटील व महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विचार परीक्रमेतील गांधीजीविचारांची सद्यकालीन उपयुक्तता विषयावर आठवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपले मत मांडताना ते म्हणाले कि गांधीजी डोक्यात झिरपले पाहिजेत ते धो धो पावसासारखा वाहून जाता कामा नये. गांधी १०० वर्षांपूर्वी हवे होते आजही हवे आहेत. १०० वर्षांपूर्वी जी आव्हानं होती तीच आजही पुन्हा उभी आहेत आणि आजच्या समस्यांना गांधी विचार उपयोगी होतात. लीग ऑफ नेशन ते युनायटेड नेशनचा कालावधी हा गांधीजींचा कालावधी आहे. प्रश्न उभा राहिला की गांधी उभे रहातात उत्तर घेऊन. गांधीजींना नई तालीमचे शिक्षण अभिप्रेत आहे, गांधीना विकासाचे विकेंद्रीकरण अपेक्षित होते, गांधीजींचा राम हा रहिम येशू बुद्ध या सर्वांमध्ये वसलेला आहे, धर्मांधता टाळायलाच हवी तरच गांधी विचार टिकेल, आइडिया आफ इंडिया फक्त गांधीजींनी टिकवली आहे,जातीयता आणि धर्मांधता गांधीजींनी आपल्या आयुष्यातून काढून टाकली होती, देश टिकवण्यासाठी मी द्वेष टिकू देणार नाही, राजकारणाचे  युवकांनी भांडवल होता कामा नये, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग विवेकाचा आहे असे गांधीजींचे विविध विचार त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाॅ अमोल शेंडगे होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ चंकेश्वर लोंढे यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख डाॅ. विश्वनाथ आवड यांनी करून दिली.  या कार्यक्रमासाठी डाॅ आबासाहेब देशमुख, प्रा विष्णु सुर्वे , डाॅ. अपर्णा कुचेकर, डाॅ दत्तात्रय बागडे , डाॅ हणमंत आवताडे , डाॅ बाळासाहेब मुळीक, डाॅ. विशाल साळुंखे, डाॅ नवनाथ पवार, डाॅ चंद्रशेखर ताटे देशमुख, प्रा निवृत्ती लोखंडे, मा. रविराज लव्हाळे, गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, मारूती सुर्वे, महादेव चव्हाण, संग्राम तोरसकर, समाधान वाघमोडे, किरण भांगे, सौरव गुरव , सुरज ननवरे, समाधान पराडे, शामबाला क्षिरसागर व राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन नागनाथ साळवे याने केले तर आभार कुमारी जयश्री मगर हिने मानले
Reactions

Post a Comment

0 Comments