केंद्र शासनाच्‍या लोकाभि‍मुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवाव्यात सहासचीव विक्रम सहाय यांचे निर्देश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 25, 2020

केंद्र शासनाच्‍या लोकाभि‍मुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवाव्यात सहासचीव विक्रम सहाय यांचे निर्देश

केंद्र शासनाच्‍या लोकाभि‍मुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवाव्यात  सहासचीव विक्रम सहाय यांचे निर्देश








पुणे, दि. २५ – केंद्र शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विवीध विभागांनी सक्रीयपणे काम करावे, असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचीव विक्रम सहाय यांनी राज्यातील अधिका-यांच या आढावा बैठकीत दिले.   पुणे येथील राष्ट्रीय फिल्म संग्राहालय येथे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो च्या अधिका-यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत  बोलत होते. यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा उपस्थीत होते. सहाय म्हणाले, केंद्र शासनाचे फलॅगशीप कार्यक्रम सामान्य जतनेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिका-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचबरोबर जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधुन योजनांची माहिती दयावी तसेच अमंलबजावणीची सदयस्थीतीबाबत शासनालाही अवगत करावे. योजनांच्या अमलबजावणीचे संनियत्रणही अधिका-यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यातील सर्व अधिका-यांना कार्यालयीन कामकाजासाठी टॅबचे वितरण करण्यात आले. दरम्यान सकाळी पुणे शहरातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पत्रसूचना कार्यालय व इतर विभागांचा समन्वय साधण्यासाठी मध्यवर्ती इमारतीची आवश्यकता असल्याने  सहाय यांनी विभागीय आयुक्तालयाच्या जवळील भारत संचार निगमच्या इमारतीची पहाणी केली. केंद्र सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यालयात अदयायावत तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकार, जनसामान्य तसेच विदयार्थांना माहिती देण्यासाठी माध्यम केंद्र (Media center ), एम्पीथीएटर, सभागृह स्थापन करण्यात येणार असल्याचे सहाय यांनी सांगीतले. या वेळी बिएसएनएलचे प्रधान महाव्यस्थापक सुनिलकुमार, विपुल अग्रवाल, महाव्यवस्थापक  पंकज मिश्रा, अधिक्षक अभियंता. संजय श्रीवास्तव आदीं उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages