Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षीच्या ४ लाख १ व्या साखर पोत्यासह २ कोटी विज विक्री युनिटचे पूजन

सहकार महर्षीच्या ४ लाख १ व्या साखर पोत्यासह २ कोटी विज विक्री युनिटचे पूजन
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१९-२०२० गळीत हंगामात उत्पादित झालेल्या४लाख१ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच बगॅसवर आधारित ३३ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून एक्सपोर्ट केलेल्या २ कोटी वीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक यादवराव घाडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे कारखान्याचा सीजन २०१९-२०२०  गळीत हंगाम दि. २४/११/२०१९ रोजी सुरू झाला असून दि. २१/०१/२०२० अखेर ४लाख २हजार ३८६मे.टन उसाचे गाळप होऊन ४लाख ७हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन झालेले असून सरासरी उतारा १०.४६ टक्के व आजचा साखर उतारा ११.३८ टक्के आहे. तसेच को-जनरेशन प्रकल्पामध्ये दिनांक २४/११/२०१९  पासून २१/०१/२०२० अखेर ३ कोटी  ६१ लाख ५९ हजार ७६१ युनिट वीज निर्माण होऊन, २ कोटी २४ लाख ७३ हजार ५३८ युनिट वीज विक्री केलेली आहे. तसेच चालू सीजनमध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिसलरी मध्ये दिनांक २१/०१/२०२० अखेर ३६ लाख १४ हजार ९२२ लिटर्स  रेक्टिफाइड स्पिरित तसेच २१ लाख १९ हजार ८१५ लिटर्स  इथेनॉल उत्पादन झाले आहे तर ऍसिटिक ऍसिड प्रकल्पामध्ये ५२मे.टन.  ॲसिटाल्डीहाईड व ५३मे.टनअसिटिक ऍसिडची निर्मिती झाली आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील सर्व संचालक, सभासद, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख ,कामगार युनियन प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments