Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रविण मोहिते आंतरराष्ट्रीय “MDRT 2021”पुरस्काराने सन्मानित .












प्रविण  मोहिते  आंतरराष्ट्रीय  “MDRT 2021”पुरस्काराने सन्मानित .

विमा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित
सांगोला (प्रतिनिधी):- भारतीय आयुर्विमा महामंडळ, पंढरपूर शाखेचे सांगोला येथील श्री.प्रविण मधुकर मोहिते यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार MDRT 2021 या नुकताच नोव्हेंबर अखेर प्राप्त झाला आहे. त्याबद्दल पंढरपूर शाखा व सांगोला येथील श्री.मिलिंद वंजारी SBA विकास अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.रमेश राठोड सर चिफ मॅनेजर, पंढरपूर शाखा LIC, आणि उदय बनसोड ब्रँच मॅनेजर पंढरपूर शाखा LIC.  यांच्या हस्ते संपन्न झाला. 
    MDRT हा किताब जगातील अतिउत्कृष्ठ काम करणार्‍या (जीवन विमा, साधारण विमा, आरोग्य विमा व म्युच्युअल फ़ंड) क्षेत्रातील विमा प्रतिनिधीस दिला जातो. यासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हा कालावधी विचारात घेतला जातो.  किताब प्राप्त विमा प्रतिनिधींची दरवर्षी परिषद अमेरिका/कॅनडा/ग्रेटब्रिटन या देशामध्ये जून महिन्यामध्ये भरते. त्यासाठी MDRT प्राप्त ही  अट असते. 
श्री.प्रविण मोहिते हे सांगोला सारख्या दुष्काळी भागामध्ये २००३ सालापासून भारतीय आयुर्विमा महामंडळ पंढरपूर शाखेचे विमा प्रतिनिधी आहेत. ते सतत २०१० सालापासून भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ‘‘चेअरमन क्लब’’विमा प्रतिनिधी आहेत. चालूवर्षी १ जानेवारी २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ म्हणजेच फक्त ११ महिन्यामध्ये त्यांनी MDRT हा आंतरराष्ट्रीय किताब प्राप्त केला आहे. त्यामुळे ते जून २०२० मध्ये घेणार्‍या  MDRT परिषदेसाठी भारतातून जाणार्‍या भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यासाठी लागणारा रजिस्ट्रेशन खर्च भारतीय आयुर्विमा महामंडळ करते.
या परिषदेमुळे संपूर्ण जगामध्ये उत्कृष्ठ कार्य करणार्‍या वेगवेगळ्या विमा क्षेत्रातील प्रतिनिधी सोबत विचारांची देवाण-घेवाण या क्षेत्रातील जागतिक आव्हाने व संधी याबद्दलच्या कार्यशाळेत भाग घेवून श्री.प्रविण मोहिते पुढे आणखी अतिशय चांगल्या सेवा आपल्या ग्राहकांना देतील. त्यांचा त्यांना लाभ मिळेल.
या त्यांच्या यशामुळे LIC विमा प्रतिनिधी व या भागातील जनतेचा दृष्टीकोन बदलणार आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या असंख्य  विमा प्रतिनिधींना तसेच या क्षेत्रात नवीन येवू इच्छिणार्‍या युवकांना विमा प्रतिनिधी नवीन संधी आहे असे निश्‍चित वाटते. या संधीचा बेरोजगार तरुण/तरुणींनी निश्‍चित विचार करावा असे या निमित्ताने वाटते. 
Reactions

Post a Comment

0 Comments