अकलूज मध्ये महामानवास वादन, - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 8, 2019

अकलूज मध्ये महामानवास वादन,

                      




अकलूज मध्ये महामानवास वादन,
अकलूज ( प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज मध्ये विविध संस्थांच्या वतीने अभिव विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
         सकाळी ९.०० वाजता अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर अकलूज  ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते- पाटील यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, सदस्य संतराम सोनवणे, आदित्य आर्वे, विशाल फुले, विशाल मोरे, किरण धाइंजे, विज्ञान लोंढे व अकलूज परिसरातील नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages