मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध- आ. यशवंत माने
आ.माने व बाळराजे पाटील यांचा तालुक्यात आभार दौरा
मोहोळ,प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील बहुतेक सुविधांसह ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून जनतेने २१ हजार मतांनी विजय केल्याबद्दल मी मतदारांचा ऋणी असून तालुक्यात सर्वाधिक विकास कामे करून माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेल असे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले.
माजी आ राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोमहर्षक विजय मिळवत नुतन आमदार यशवंत विठ्ठल माने यांना तब्बल २१ हजाराच्या विक्रमी मताधिक्याने विजयी केल्याबद्दल तसेच मोहोळ मतदारसंघातील मतदारांनी विकासाच्या दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावागावात जाहीर आभार आणि कृतज्ञता दौऱ्याचे आयोजन आज पासून दि.७ ते १४ डिसेंबर असे करण्यात आले आहे. यानुसार वाफळे,देवडी ,तेलंगवाडी,शेटफळ,आष्टी,खंडाळी, पापरी,येवती,कोन्हेरी,वडाचीवडी, हिवरे,चिखली,यावली आदी गावांचा आभार दौरा जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आमदार यशवंत माने यांनी केला,यावेळी ते बोलत होते.
या आभार दरम्यान प्रत्येक गावातील प्रमुख तीन समस्या लिहून घेतल्या जात असून त्या लवकरच पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत येणारी विकासकामे ग्रामीण भागापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी बोलताना बाळराजे पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच विकास सोसायटी चेअरमन यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
0 Comments