मोहोळ,प्रतिनिधी
हैदराबाद येथील पशू वैद्य चिकीत्सक डॉ. प्रियंका रेडी
या युवतीवर काही नराधमांनी सामुदायिक बलात्कार
करुन,तीला जाळून टाकण्यात हत्या करण्यात आले.
घडलेला प्रकार संपूर्ण मानव जातीस काळिमा
फासणारा आहे.आजही महिला व मुली सुरक्षित
नसल्याचे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे.
निर्भयानंतर असे प्रकार सातत्याने घडत असून,
महिलांवर बलात्कार करणार्या नराधमांचे प्रकरण
फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोहोळ येथील मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.
मोहोळ शहर मुस्लीम जमीयत च्या वतीने
हैद्राबाद-बैंगलोर महामार्गावर जि.रंगारेड्डी येथील महीला डॉक्टर प्रिंयका रेड्डी यांच्या वर झालेल्या घटनेचा निषेध मोर्चा काढुन मोहोळ तहसीलदार यांना निवेदन देन्यात आले.तसेच शहरासह जिल्ह्यात देखील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत असून, अनेक ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार समोर येत आहे.अशा घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये,यासाठी पोलीस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्यात यावे.अशी मागणी यावेळी एजाज तलफदार यांनी केली.
यावेळी रफीक हारणमारे,एजाज तलफदार,जिब्राईल शेख,ईम्रान शेख,आरीफ तलफदार,सुरज तलफदार,आशु शेख,उमेर शेख,अरबाज सुर्खी,बाबा मुजावर,अरबाज मुजावर,अरीफ शेख,निहाल शेख,आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो.
मोहोळ शहर मुस्लीम जमीयत च्या वतीने महीला डॉक्टर प्रिंयका रेड्डी यांच्या वर झालेल्या घटनेचा निषेध मोर्चा काढुन मोहोळ तहसीलदार यांना निवेदन देन्यात आले.
0 Comments